मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (10:14 IST)

केरळमध्ये महापुराने आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू

केरळमध्ये जोरदार पाऊस आणि पूरस्थितीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी (16 ऑक्टोबर) केरळमध्ये मदतकार्य करण्यासाठी तिथं लष्कराला तैनात करण्यात आलं.
 
पुरामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचीही बातमी आहे.
 
या परिस्थितीशी निपटण्यासाठी केरळमधील दोन जिल्ह्यांमध्ये 11 बचावपथके रवाना करण्यात आली आहेत. तसंच लष्कराकडूनही मदत घेण्यात येत आहे.
 
केरळच्या तिरुवनंतपुरम आणि कोट्टायम जिल्ह्यांमध्ये ही मदत पाठवण्यात आल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री राजन के यांनी दिली.