गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :लखनौ , रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (19:05 IST)

कुशीनगर : टॉफी खाल्ल्याने 4 मुलांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे चार मुलांचा मृत्यू झाला आहे. मुलांनी घराबाहेर पडलेली सापडलेली टॉफी खाल्ली होती, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. 
 
मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुलींचा समावेश आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दारावर टॉफी फेकली, जी मुलांनी खाल्ली आणि त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. 
 
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या दोन कुटुंबातील चार मुलांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुलांनी बाहेर फेकलेली टॉफी खाल्ली, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मृतांमध्ये दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. अपघातानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. 
 
मृत्यू झालेल्या मुलाच्या आईने सांगितले की, "माझ्या दारात टॉफी आणि पैसे फेकले गेले. माझ्या मोठ्या मुलीने टॉफी उचलून सर्वांमध्ये वाटून खाल्ली. पाच मिनिटांनी सर्वांना त्रास होऊ लागला. सर्वांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे त्यांचा मृत्यू झाला.  टॉफी कोणी फेकली हे आम्हाला माहित नाही."
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे.