गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (12:30 IST)

आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने तीन मजली इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये संततधार पावसामुळे आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक लोक वाहून गेले. राज्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे.  पावसामुळे आलेल्या पुरामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर आणि जेसीबीची मदत घेतली जात आहे. आकाशात चॉपर आणि खाली जेसीबीच्या माध्यमातून लोकांना मदत केली जात आहे.
अनंतपूर जिल्ह्यातील कादिरी शहरात रात्री उशिरा मुसळधार पावसामुळे जुनी 3 मजली इमारत कोसळून तीन मुले आणि एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. बचावकार्य सातत्याने सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही 40 हून अधिक लोक अडकले आहेत. सर्कल इन्स्पेक्टर सत्यबाबू यांनी ही माहिती दिली आहे.