रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: तिरुपती , शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (17:18 IST)

अख्खं तिरूपती शहर पाण्याखाली

तिरुमालाच्या रस्त्यांसह तिरुपतीतील अनेक भाग जलमय झाले आहेत. देशातील सर्वाधिक श्रीमंत तिर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या तिरुमला तिरुपतीमध्ये (Tirumala Tirupati) मुसळधार पावसाने (Heavy Rain) कहर केला आहे.  
 
तर मुख्य मंदिराच्या बाहेरील भागासह आणि दर्शन रांगेचा परिसर पाण्याखाली गेला आहे. अनेक ठिकाणी भाविक अडकले आहेत. मंदीराच्या सभोवताली असलेल्या डोंगरामधून येणारा पाण्याचा प्रवाह अभूतपूर्व असून गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच अशी परिस्थिती उदभवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र हवेच्या बुडबुड्यात बदलल्याने चित्तूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.
 
तिरुमला घाटातील दोन घाट रस्ते भूस्खलनामुळे अधिकाऱ्यांनी बंद केले. 18 तारखेपर्यंत पदपथ खुला होणार नाही. तिरुमला येथील मोबाईल नेटवर्क सेवाही विस्कळीत झाली.
 
तिरुपतीमध्ये आज पुराच्या धोक्याची कमाल पातळी जाहीर करण्यात आली आहे. तिरुपती शहरात पुराच्या पाण्यात काही अंतरावर वाहनेही वाहून गेली. शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचले आहे.