तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळले, 4 मुलांसह 9 जणांचा मृत्यू
तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात मुसळधार पावसात घर कोसळून चार मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.