शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 8 जानेवारी 2023 (17:03 IST)

गॅस गळतीमुळे गुदमरून दोन मुलांसह चौघांचा मृत्यू झाला

सीतापूर जिल्ह्यातील बिसवान ठाण्या परिसरातील झज्जर येथे गॅस गळती मुळे दोन मुलांसह जोडप्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री चौघेही एकाच खोलीत झोपले. थंडी पासून वाचण्यासाठी कुटुंबात पेट्रोमॅक्स पेटवून झोपले. गॅस गळती होऊन स्फोट होऊन चौघांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
 
झज्जरचा रहिवासी आसिफ (40) एका मदरशात शिकवायचा. शनिवारी रात्री तो पत्नी शगुफ्ता (36) आणि मुली मायरा (3) आणि झायरा (2) यांच्यासोबत घरातील एका खोलीत झोपला होता. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका ओळखीच्या  व्यक्ती नेअनेक वेळा फोन करून देखील असिफ ने फोन उचलला नाही म्हणून त्यांना बघण्यासाठी आला. दरवाजा न उघडल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.
 
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता खोलीत चौघांचे मृतदेह पडलेले असून एलपीजीचा उग्र वास येत असल्याचे त्यांना आढळले. पेट्रोमॅक्स जवळच ठेवला होता, ज्याचा वापर थंडीपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. पेट्रोमॅक्सचा गॅस संपला होता. घटनेची माहिती होताच परिसरात  घबराट पसरली. चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनास पाठविले असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit