गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (19:46 IST)

कासगंज : ट्रेनच्या छतावर चढून तरुणाचा होरपळून मृत्यू , प्रवासी बघून हादरले

यूपीच्या कासगंजमध्ये एक वेदनादायक दुर्घटना समोर आली आहे. महिला प्रवाशाची चप्पल घेण्यासाठी ट्रेनच्या बोगीवर चढलेल्या तरुणाचा जिवंत होरपळून मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनच्या छतावर चढून एका तरुणाचा वेदनादायक मृत्यू झाला. रेल्वेच्या छतावर चढलेल्या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. ट्रेनच्या छतावर पडून तरुण काही वेळ जळत राहिला. तरुणाला जिवंत जळताना पाहून घटनास्थळी एकच खळबळ उडाली. त्यानंतर ओएचई लाइन बंद करण्यात आली. त्यानंतर आग विझवण्यात आली आणि तरुणाला खाली आणण्यात आले. ही घटना रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माकड महिला प्रवाशाची चप्पल घेऊन ट्रॅनच्या बोगीत चढले होते.
माकडाकडून चप्पल घेण्यासाठी तरुण रेल्वेच्या बोगीवर चढला. दरम्यान, त्याला ओएचई लाइनची धडक बसली. तरुणाला जिवंत जळताना पाहून प्रवासीही हादरले.ओएचई करंट बंद झाल्यानंतर सुमारे 15 मिनिटे हा तरुण जळत होता, असे सांगण्यात आले. कासगंजहून फारुखाबादला जाणारी एक्स्प्रेस गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक-2 वर उभी होती. त्यानंतर माकड एका महिला प्रवाशाची चप्पल घेऊन पळून गेले. त्याचवेळी प्रवाशांच्या आवाजाने माकडाने बोगीतच चप्पल टाकून पळ काढला. त्यानंतर कासगंज स्थानकावर काम करणारा अशोक हा महिला प्रवाशाची चप्पल घेण्यासाठी ट्रेनवर चढला. आणि त्याला ओएचई लाईनची धडक लागली. आणि तो होरपळला. 
 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विजेचा झटक्याने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद करून अग्निशमन उपकरणाच्या साह्याने आग विझवली. त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. अपघाताची माहिती मृतांच्या नातेवाईकांनाही देण्यात आली.
 
Edited By - Priya Dixit