गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 7 जानेवारी 2023 (18:09 IST)

देशात थंडीची लाट, एकूण 27 जणांचा थंडी लागून मृत्यू महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

सध्या देशभरात थंडीची लाट अली आहे. देशभरात थंडीने 27 जणांचा मृत्यू झाला असून येत्या काही दिवसात थंडीचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. देशात उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. येथे रात्रीचे तापमान 3.2 सेल्सिअस पर्यंत घसरले होते. थंडीचा कडाका वाढला असून संपूर्ण उत्तर भारतात नागरिकांचे हाल होत आहे. कानपूरच्या शासकीय रुग्णालयात गेल्या दोन दिवसात हृदय विकाराचा झटका आणि ब्रेनस्ट्रोक येऊन 25 जणांचा मृत्यू झाला आहे. 

देशात थंडीचा जोर वाढला असून महाराष्ट्रातील नागपुरात थंड वारे सुरु आहे. नागपुरात तापमानाचा पारा घसरला. त्यामुळे थंडी लागून दोघांचा मृत्यू झाला. येत्या दोन दिवसादात राज्यात थंडीचा प्रभाव वाढणार असून तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या दोन दिवसांत थंडीचा जोर वाढणार असून राज्यात यलो अलर्ट जारी केले आहे. देशाची राजधानी दिल्ली मध्ये थंडीचा कडाका वाढला असून काही भागात ऑरेंज तर काही भागात रेड अलर्ट जारी केले आहे. 
 
Edited By - Priya Dixit