गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2023 (12:48 IST)

आमदार योगेश कदमांचा अपघात

yogesh kadam
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. मात्र आता हा अपघात समजण्याची भीती आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. आमदार योगेश कदम आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या निकटवर्तीयांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 
 
शुक्रवारी रात्री आमदार योगेश कदम आपल्या मतदारसंघाचा कार्यक्रम आटोपून मुंबईला जात असताना कशेडी घाटात रात्री दहाच्या सुमारास एका टँकरने कदम यांच्या गाडीला मागून धडक दिली. अपघातानंतर टँकर उलटला आणि टँकरचालक पळून गेला. हा अपघात एवढा भीषण होता की कदम यांच्या कारचा चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने आमदार कदम व त्यांचे साथीदार या अपघातातून थोडक्यात बचावले. कदम यांचा चालक दीपक कदम आणि दोन सुरक्षा पोलिस किरकोळ जखमी झाले. 
 
या अपघातानंतर आमदार योगेश कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मी सुरक्षित आहे, काळजी करू नका, असे आवाहन कदम यांनी कार्यकर्त्यांना केले. व्हिडीओ शेअर करून त्यांनी माँ जगदंबेच्या कृपेने आपण सर्व सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. माझे पुढील कार्यक्रम पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होतील असेही त्यांनी सांगितले.