शुक्रवार, 13 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 7 जानेवारी 2023 (17:20 IST)

लातूर जिल्ह्यात जन्मदात्या आईनेच केला पोटच्या मुलीचा निर्घृण खून , आईला अटक

baby legs
आई आणि मुलाचं नातं काही वेगळच असतं.पण  जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या तीन दिवसाच्या मुलीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची  धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. रेखा किसान चव्हाण असे या महिलेचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यात रेखा किसन चव्हाण नावाची महिला आपल्या माहेरी काटगाव तांडा येथे आली तिची प्रसूती जवळाच्या प्राथामिक आरोग्य केंद्रात 27 डिसेंबर रोजी झाली तिला मुलगी झाली रेखाची ही दुसरी प्रसूती होती. या पूर्वी रेखाला एक अजून मुलगी आहे. 

मुलगा होईल असे तिला वाटले पण दुसरी देखील मुलगी झाल्याने तिला नैराश्य आलं आणि तिने रुमालाचा साहाय्याने गळा आवळून आपल्या तीन दिवसाच्या चिमुकलीचा निर्घृण खून केला. पोलिसांना ही बाब तपासात उघडकीस आली. पोलिसांनी जातेगाव पोलीस ठाण्यात रेखावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे.  
 
Edited By - Priya Dixit