सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (16:12 IST)

Gujarat: ओव्हरटेक करणे जीवावर बेतले

accident
गुजरातमधील वडोदरा येथील कपुराई ब्रिज राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी लक्झरी बस आणि ट्रेलरमध्ये मोठा अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चारच्या सुमारास लक्झरी बस राजस्थानहून सुरतला जात असताना हा अपघात झाला. सध्या शहर वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना उपचारासाठी एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  
ओव्हरटेक केल्यामुळे अपघात
महामार्गावरील एका पुलाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना पाठीमागून आलेल्या ट्रेलरला धडक बसली, असे पाणीगेट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस उपायुक्त (झोन-3) यशपाल जगनिया यांनी सांगितले की, या अपघातात सहा प्रवासी ठार झाले असून सुमारे 15 जण जखमी झाले आहेत.
 
चौघांचा जागीच मृत्यू, दोघांचा रुग्णालयात मृत्यू
ते म्हणाले की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये एक बालक, एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited by : Smita Joshi