सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (12:26 IST)

१८ जानेवारीपासून हार्दिक पटेल बेपत्ता, पत्नीचा सरकारवर आरोप

गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल तब्बल २० दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा त्यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी केला आहे. १८ जानेवारीपासून हार्दिक पटेल बेपत्ता असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, गुजरात सरकार हार्दिक पटेल यांना लक्ष्य करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
 
हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या प्रकरणात १८ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, ते सध्या कुठं आहेत, अशी विचारणा आपल्याकडे पोलिसांकडूनच होत असल्याचेही किंजल म्हणाल्या आहेत. भाजपामध्ये गेलेल्या अन्य दोन नेत्यांवर अशी कारवाई का होत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. हार्दिक पटेल यांनी लोकांना भेटावं अशी गुजरात सरकारची इच्छा नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.