गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नागपूर , सोमवार, 16 डिसेंबर 2019 (12:16 IST)

फडणवीसांचे टीकास्त्र : सत्तेसाठी किती लाचारी ठेवावी?

कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत. सत्तेसाठी किती लाचारी ठेवाची, सत्तेसाठी सौदेबाजीची आवश्यकता नाही, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यावर मवाळ भूमिका घेतल्याची टीका करत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले.
 
देशभरात राहुल गांधी यांच्या सावरकरांचा अपमान करणार्‍या वक्तव्याविरोधात उद्रेक सुरू झाला असून जो पर्यंत राहुल माफी मागत नाहीत, तोर्पर्यंत हे आंदोलन आता शांत होणार नाही.
 
नागपुरात आज (सोवारी) हिवाळी अधिवेशन सुरू होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी सावरकरांचा अपमान करणार्‍या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार्‍या शिवसेनेवर फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. येथे सौदेबाजी करण्याची आवश्कता नाही. सत्तेची लाचारीमुळे सौदेबाजी करण्यात येत असून त्यांची सौदेबाजी त्यांना लखलाभ, असा टोला फडणवीस यांनी शिवेसेनेला लगावला.
 
सावरकरांना मानावेच लागेल
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. गांधी हे आडनाव लावून कुणाला गांधी होता येत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. राहुल यांना सावरकरांना मानावेच लागेल. ज्याप्रमाणे गांधी आणि नेहरुंना मानावेच लागते, त्याप्रमाणे सावरकरांनाही मानावेच लागेल, असे फडणवीस म्हणाले. येथे सौदेबाजीची आवश्यकताच नाही.