गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (16:55 IST)

कारमध्ये गुदमरून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

कारमध्ये गुदमरून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आऊटर दिल्लीच्या रणहोला परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. राजू असं या कॅब चालकाचं नाव आहे. तो बुधवारी दुपारी कॅब घेऊन घरी आला होता. घराबाहेर कार उभी करून तो घरात गेला. घरात वरच्या मजल्यावर गेल्यावर कार लॉक करायला विसरून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याने वरूनच रिमोटने कार बंद केली. याच दरम्यान त्याचा मुलगा सोनू (वय ४) आणि त्याचा भाचा राज ( वय ६) हे दोघेही खेळताखेळता कारमध्ये गेले होते. कारमध्ये एसी सुरूच होता. त्यामुळे या मुलांना कारमध्ये झोप लागली. कार लॉक केल्यावर एसी बंद झाला. त्यानंतर सात तास कार न उघडल्याने त्यांचा कारमध्येच गुदमरून मृत्यू झाला. दुसरीकडे मुलं दिसत नाहीत म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर सदरचा प्रकार उघड झाला.