सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 20 जानेवारी 2024 (14:57 IST)

अनाथआश्रमात लहान मुलांसोबत क्रूर व्यवहार, उलटे लटकवून बाथरूम मध्ये बंद केल्याचा आरोप

rape
Cruel treatment of children in the name of punishment in Indore orphanage : इंदौर मध्ये प्रशासन द्वारा सील केलेले एक तथाकथित अनाथआश्रम मध्ये शिक्षेच्या नावाखाली लहान मुलांसोबत क्रूर व्यवहारच्या या आरोप वरून पाच महिलांविरोधात प्राथमिक गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या एक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. लहान मुलांना संभाळणारी एक गैर सरकारी संस्थाने याला अनाथआश्रमच्या  ऐवजी वसतिगृह सांगितले आहे आणि प्रशासनच्या कारवाइला मध्यप्रदेश उच्चन्यायालय मध्ये आव्हान देवून बंदी प्रत्यक्षीकरण याचिका दाखल केली आहे. पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रशासनाने विजयनगर क्षेत्र मध्ये 'वात्सल्यपूरम' नावाच्या कथित अनाथआश्रमाला अवैध संचलनच्या आरोपात १२ जानेवारीला सील केले होते आणि यात राहत असलेल्या मुलींना राजकीय बाल संरक्षण आश्रम आणि एक अन्य संस्थेत पाठवून दिलेत या मुलींचे वय ४ ते १४ वर्ष एवढे आहे. 
 
शिक्षेच्या नावाखाली लहान मुलांसोबत क्रूर व्यवहार : अधिकाऱ्यांच्या सांगितलेल्या महितीवरून अनाथआश्रमात राहत असलेल्या मुलींनी बाल कल्याण समितीला सांगितले की, या परिसरात शिक्षेच्या नावाखाली लहान मुलांसोबत क्रूर व्यवहार केला जात होता त्यांनी १७ जानेवारीला रात्री नोंद केलेल्या प्राथमिक कारवाइत सांगितले की चार वर्षाच्या एका मुलीने जेव्हा तिचे कपडे मलिन केलेत तर तिला मारण्यात  आले व नंतर काही तास तिला बाथरूम मध्ये बंद करून ठेवले आणि दोन दिवस जेवायला पण दिले नाही. 
 
लहान मुलांना उलटे लटकवले जात होते: प्राथमिक मध्ये हा आरोप पण लावला गेला आहे की अनाथआश्रमात लहान मुलांना उलटे लटकवट होते. आणि  खाली तव्यावर लाल तिखट टाकून ती पेटवून देत होते अधिकारी यांनी सांगितले की प्राथमिक मध्ये दोन मुलांना एक लहान मुलीच्या हातून गरम चटके जबरदस्तीने द्यायला लावले आणि एका मुलीला अन्य मुलांसमोर निवस्त्र करून भट्टीच्या जवळ नेवून जाळन्याची धमकी दिली असे आरोप आहे. 
 
संस्थाने याचिका दाखल केली: 'वात्सल्यपूरम' परिसर चालवणारी संस्था 'वात्सल्यपूरम जैन वेलफेयर सोसायटी' ने मध्यप्रदेश  उच्चन्यायलयच्या इंदौरपीठ मध्ये बंदीप्रत्यक्षीकरण  याचिका दाखल केली आहे. संस्थेचे वकील विभोर खंडेवाल यांनी सांगितले की, 'वात्सल्यपूरम' मध्ये कुठलाच आश्रम नही पण एक वसतिगृह आहे जिथे फक्त ५ रुपये वार्षिक फी मध्ये गरीब घरतील मुलांची देखभाल केली जाते.
 
बंदी प्रत्यक्षीकरण याचिका मध्ये मदत  : खंडेवाल यांनी दावा केला आहे की प्रशासनने अनधिकृत पणे 
'वात्सल्यपूरम' ला सील केले आणि यात राहत असलेल्या मुलांना अन्य संस्थांमध्ये पठवतांना कायद्याचे पालन केले नाही. त्यांनी सांगितले की बंदीप्रत्यक्षीकरण याचिका मध्ये मदत मागितली आहे की या परिसरातील मुलांना वसतिगृह प्रशासन किंवा त्यांच्या आईवडिलांकडे सोपवले जावे. खंडेवाल यांनी संस्थेच्या लोकांच्या विरोधात नोंदवलेल्या प्राथमिक आरोपांना फेटाळले आहे. 
 
नोंदवलेल्या प्राथमिकी मध्ये अनाथआश्रम मधील ५ महिलांचे नाव : विजय नगर पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षक कीर्ति तोमर यांनी सांगितले की भारतीय दंड विधान आणि किशोर न्याय अधिनियमच्या संबंधित प्रावधानानंशी संबंधित नोंदवलेल्या प्राथमिकीमध्ये अनाथआश्रम यातील ५ महिला यांचे नावे आहेत या अरोपांची तपासणी आता सुरू होणार आहे सध्यातरी या केस मध्ये अजुन कुठल्याच आरोपीला अटक केलेली नाही  असे उपनिरीक्षक यांनी सांगितले. 
 
इंदौरची बाल कल्याण समितिची अध्यक्ष पल्लवी पोरवाल यांनी सांगितले की अनाथआश्रम यातील मुले राजस्थान आणि गुजरातचे राहणारे आहेत आम्ही या राज्यातील बाल कल्याण समितीला पत्र लिहून सांगितले आहे की त्यांनी या मुलांचे  सामाजिक-आर्थिक पृष्ठभुमिचा तपास करून आम्हाला रिपोर्ट कळवा म्हणजे यांचे पुनर्वसन करता येईल.