मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (14:57 IST)

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान? शेवटच्या रांगेत उभे केल्याने सर्वत्र टीकेची झोड

team india political
एकेकाळी केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता होती, तेव्हा राज्यातील नेते सतत दिल्लीच्या वाऱ्या करत असत. त्या काळात प्रसिद्ध व्यंगचित्रकार व शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे मार्मिक मध्ये दिल्लीमध्ये राज्यातील नेते विशेषतः मुख्यमंत्री यांचा कसा अपमान होतो, या संदर्भात मार्मिक मध्ये व्यंगचित्र प्रसिद्ध करत असत. या घटनेची आठवण होण्याचे कारण म्हणजे सध्या देखील दिल्लीत तसाच एक प्रसंग घडल्याचे सांगण्यात येते, त्यावरून उलट सुलट चर्चा सुरू आहे.
 
देशाची राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीला देशातील जवळपास सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र, या बैठकीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मात्र अनुपस्थित राहिले. या बैठकीचा एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला विषय ठरला आहे. नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री आणि उपस्थित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा एक फोटो अनेकांकडून ट्वीट करण्यात आला आहे. या फोटोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेत उभे असल्याचे दिसून येत आहे. त्यावरुन दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान झाल्याची टिका सूर आता विरोधकांकडून आळवला जातोय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
 
इतिहासात औरंगजेबाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी गेले, दुसऱ्या रांगेत उभं केलं म्हणून त्यांनी ती सभा सोडली. आता आपल्याला तिसऱ्या रांगेत जाऊन उभे राहावे लागत आहे. परिस्थिती किती बदलली आहे. महाराष्ट्रात किती झुकलाय हे पाहायला मिळत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. त्याचवेळी तिथला प्रोटोकॉल अल्फाबेटिकली असतो, त्यामुळे ते मागे उभे राहिले असती, असेही पाटील खोचकपणे म्हणाले.