शुक्रवार, 2 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2017 (15:51 IST)

जवानाकडून दोन ग्रेनेड जप्त

jammu kashmir
जम्मू काश्मीरमधील श्रीनगर विमानतळावर सैन्याच्या एका जवानाकडून दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. सैन्यातील जवान भूपाल मुखिया हा सीमा रेषेवर ड्यूटीवर असतो. सोमवारी सकाळी दिल्लीला जाण्यासाठी भूपाल श्रीनगर विमानतळावर आला होता. तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेत दोन ग्रेनेड आढळल्याने विमानतळावर खळबळ उडाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने भूपालला पोलिसांच्या ताब्यात दिले. प्राथमिक चौकशीत भूपालने मासे पकडताना पाण्यात स्फोट घडवण्यासाठी हे ग्रेनेड नेत असल्याचे सांगितले.मात्र पोलिसांनी कसून चौकशी करताच एका कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यासाठी कुरिअर म्हणून काम करत असल्याची कबुली त्याने दिली.  या जवानाची अजूनही चौकशी सुरु आहे.