बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (11:21 IST)

जम्मूच्या अर्निया क्षेत्रात घुसखोरीचा कट; दहशतवादी ठार

जम्मू -भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा कट उधळला. ही घटना आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत जम्मूच्या अर्निया क्षेत्रात घडली. दहशतवाद्यांच्या एका गटाने आज भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांना घुसखोरी करणे सुलभ व्हावे यासाठी पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला.
 
काही दहशतवाद्यांनी जवानांना रोखून धरण्यासाठी गोळीबार सुरू केला. त्याचा फायदा उठवून एका दहशतवाद्याने सीमेवरील सुरक्षा कुंपण ओलांडून भारतीय हद्दीत शिरकाव केला. बीएसएफच्या जवानांनी त्याला ठार केले. बीएसएफच्या जवानांचे चोख प्रत्युत्तर आणि एक साथीदार मारला गेल्याने इतर दहशतवाद्यांनी घाबरून माघारी पलायन केले. बीएसएफच्या सतर्क जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे उधळून लावले.