गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: जम्मू , शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017 (12:11 IST)

बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद

अरनियामध्ये पाकिस्तानने भारताच्या पोस्टवर गोळीबार केला. यात भारतीय सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती बीएसएफ सूत्रांनी दिली.
 
पाकिस्तानने मोर्टार व लहान स्वयंचलित शस्त्रे वापरत भारतीय सैन्याच्या नऊ बीएसएफ पोस्टला लक्ष्य केले. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार सूरू असल्याची माहिती मिळाली. आर. एस. पुराच्या आरनिया क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असणाऱ्या गावांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये दहशत आहे. परिस्थितीशी सामना करण्यासाठी सुरक्षा दलांनी सर्व आपतकालीन सेवांची तयारी ठेवली आहे.