मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (09:09 IST)

जावेद हबीब यांना हृदयविकाराचा झटका

हरियाणातील यमुनागर येथे एका हेअर सलूनच्या उद्घाटनप्रसंगी सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदरच्या सलूनच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिदेमध्ये ते माध्यमांशी संवाद साधणार होते. मात्र पत्रकार परिषदेपूर्वीच त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते जमिनीवर पडले. हबीब यांच्या प्रकृतीत अचानक झालेल्या बिघाडामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.