बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (13:56 IST)

कॉंग्रेसला पुन्हा भाजपाचा धक्का मुंबईतील जेष्ठ नेता भाजपात

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभाराला कंटाळून पुन्हा जेष्ठ नेता भाजपात गेला आहे. हा नेता माजी आमदार आणि  उत्तर भारतीय मुख्य नेता होता.  माजी आमदार राजहंस सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसची ताकत पूर्ण कमी होणार आहे. आता निरुपम यांना कंटाळून असे प्रवेश झाल्याने कॉंग्रेसचा मतांचा टक्का कमी होणार आहे. या आगोदर गुरुदास कामत आणि निरुपम यांच्यात जोरदार संघर्ष होता. राजहंस सिंह तब्बल ४० वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. पक्षातील उत्तर भारतीय चेहरा तर मुंबई  महापालिकेत त्यांनी  आठ वर्षे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली होती.