शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (13:46 IST)

बाप्पा निघाले : लालबाग राजा सह राज्यात विसर्जनाला उत्साह (photo)

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी भावनिक  आवाहन करत आनंदात आणि उत्सहात  राज्यभरातील सार्वजनिक गणपतींना आज निरोप दिला जात आहे. तर पूर्ण राज्याचे लक्ष असलेला लाल बागचा राजा सुद्धा निघाला असून तर दुसरीकडे  मुंबईत पोलीस आणि महापालिकेकडून गणपती विसर्जनासाठी चौपाट्या तयार केल्या आहेत. राज्यात फक्त मुंबई  जवळपास  40 हजार पोलीस विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज आहेत. फक्त मुंबईत मोठ्या आणि छोटे अश्या  शंभर ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तसंच अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर वाहतूक कोंडी होवू नये म्हणून   रस्त्यांवरची वाहतूक वळवण्यात येणार आहे.
 
सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथे सुद्धा मिरवणूक सुरु झाली आहे. यामध्ये आज विधिवत पूजा करत पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तर विशेष म्हणजे यामध्ये  सुरेश कलमाडीही  सहभागी आहेत. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी अनेक बंदोबस्त केले आहेत. वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे उत्तम नियोजन केलं आहे. 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार केला आहे.
 
नाशिकचे मानाचे गणपती दुपारी मार्गस्त होणार आहेत. मात्र दुसरीकडे पोलिसांनी आणि महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. गोदावरी प्रदूषण होवू नये म्हणून अनेक समाजसेवी संस्था पुढे आल्या आहेत. तर पालिकेमार्फत शहरात सहा विभागांमध्ये एकूण 54 ठिकाणी गणेश मूर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये 26 नैसर्गिक विसर्जन ठिकाणे आणि 28 कृत्रिम तलाव आहेत.
 
सोलापुर येथे  गणेश विसर्जन उत्साहात सुरु आहे.  घरगुती गणरायाचं विसर्जन केरण्यात येत आहे.  दुपारनंतर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या जंगी मिरवणुका निघणार आहेत.