JEE Main 2022 Dates:जेईई मेन 2022 परीक्षा दोन टप्प्यात होणार
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने मंगळवार, 01 मार्च 2022 रोजी एक मोठी घोषणा केली आणि हे स्पष्ट केले की यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी JEE मेन 2022 परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल. या उपक्रमामुळे उमेदवारांना परीक्षेत त्यांचे गुण सुधारण्यासाठी दोन संधी मिळतील, जर ते एका प्रयत्नात त्यांचे सर्वोत्तम देऊ शकत नसतील तर दुसऱ्या प्रयत्नात चांगली तयारी करता येईल.
एनटीएनेही उमेदवारांना मोठा धक्का दिला आहे. NTA ने म्हटले आहे की जर एखादा उमेदवार त्याच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे से की बोर्ड परीक्षा मुळे , मुख्य प्रवेश परीक्षा देण्यापासून चुकला असेल, तर त्याला/तिला पूर्ण वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. म्हणजेच जर एखादा उमेदवार परीक्षेत चुकला तर त्याला यंदा दुसरी संधी दिली जाणार नाही.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हेही स्पष्ट केले आहे की उमेदवारांनी परीक्षेच्या दोन्ही टप्प्यांमध्ये उपस्थित राहणे आवश्यक नाही. ते कोणत्याही एका टप्प्यातील परीक्षेतही बसू शकतात. त्यांनी दोन्ही टप्प्यात भाग घेतल्यास त्यांचा गुण सुधारण्यास मदत होईल. उमेदवार त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकानुसार JEE मेन 2022 परीक्षेच्या कोणत्याही एका टप्प्यात देखील उपस्थित राहू शकतात.
संयुक्त प्रवेश परीक्षा, जेईई मेनमध्ये दोन पेपर असतील. NITs, IIITs, इतर केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्था (CFTIs) आणि केंद्रीय विद्यापीठे आणि राज्य सरकारांनी अनुदानित/मान्यताप्राप्त BE/B.Tech या पदवीपूर्व अभियांत्रिकी कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी JEE Main चा पेपर-1 घेतला जाईल. तर देशभरातील आर्किटेक्चरल अभियांत्रिकी संस्थांमध्ये बी.आर्क आणि बी. प्लॅनिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेपर-2 घेण्यात येईल. त्यांच्या स्कोअरच्या आधारावर, IIT संस्थांमध्ये जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेद्वारे प्रवेश मिळतो .