शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 मार्च 2022 (15:07 IST)

राज्यपालांच्या त्या आरोपांची CBI चौकशी होणार

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर ‘लाच’ दिल्याच्या आरोपाची आता सीबीआय चौकशी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी खुद्द जम्मू-काश्मीर प्रशासनानं सीबीआयकडं या प्रकरणाच्या चौकशीची शिफारस केली.
 
सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की, ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना युनियन आणि मोठ्या औद्योगिक घराण्यांच्या फायली क्लिअर करण्याच्या बदल्यात 300 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी पैसे स्वीकारण्यास नकार देत सौदे रद्द केले.
 
काय आहे प्रकरण
सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल झाले तेव्हा त्यांच्याकडे दोन फाईल्स आल्या होत्या. एका फाईलमध्ये अंबानींचा समावेश होता, तर दुसरी आरएसएसचा वरिष्ठ अधिकारी आणि मेहबुबा सरकारमधील एका मंत्र्याशी संबंधित होती. हे नेते स्वत:ला पंतप्रधान मोदींचे जवळचे म्हणवायचे. राज्यपालांनी सांगितले होते की ज्या विभागांच्या या फायली आहेत त्यांच्या सचिवांनी त्यांना या फायलींमध्ये घोटाळा असल्याचे सांगितले होते आणि सचिवांनीही त्यांना सांगितले होते की या दोन्ही फायलींमध्ये 150-150 कोटी रुपये मिळू शकतात.