मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (17:31 IST)

Karnataka :आईने 4 वर्षीय मुलीला बाल्कनीतून खाली फेकले

Mother killed her Daughter: आई ही मुलांची सर्वात मोठी संरक्षक मानली जाते. कारण आई फक्त मुलाला जन्म देत नाही तर त्याचे संगोपन आणि संरक्षण ही करते. आई आणि मुलाच्या प्रेमावर बरंच काही लिहिलं गेलं आहे, पण आज कर्नाटकातून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये आई आपल्या पोटच्या मुलीची वैरी बनली आणि मुलीला चक्क बाल्कनीतून खाली फेकून तिचे निर्घृण खून केले.या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 
 
एका आईने आपल्या चार वर्षांच्या मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे. या भीषण अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 4 ऑगस्टची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी बेंगळुरू सेंट्रल डिव्हिजनच्या एसआर नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये आरोपी महिलेने आपल्या मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. चौथ्या मजल्यावरून पडल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला.
 
रिपोर्ट्सनुसार, मुलगी दिव्यांग होती (बोलण्यास आणि ऐकण्यास असमर्थ). यामुळे त्याची आई खूप अस्वस्थ आणि दुःखी होती. मुलीच्या हत्येप्रकरणी आईला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी महिला नॉन प्रॅक्टिसिंग डेंटिस्ट असून मुलीचे वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.