बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 10 मे 2018 (09:01 IST)

दीड लाख सुरक्षा जवान कर्नाटक निवडणुकीसाठी

Karnataka
कर्नाटक विधानसभा निवडणूक मुक्त वातावरणात आणि शांततेत पार पडावी यासाठी मतदानाच्या दिवशी त्या राज्यात सुमारे दीड लाख सुरक्षा जवान तैनात केले जाणार आहेत. त्या राज्यात विधानसभेच्या 224 जागांसाठी 12 मे यादिवशी मतदान होईल.
 
निवडणूूक आयोगाच्या सदस्यांनी अलिकडेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या भेटीत कर्नाटकमधील तैनातीसाठी केंद्रीय निमलष्करी दलांच्या जवानांची संख्या निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार बीएसएफ, सीआरपीएफ आणि आयटीबीपी या निमलष्करी दलांचे 52 हजार जवान सुरक्षेसाठी तैनात केले जातील. याशिवाय, कर्नाटकचे एक लाख पोलीसही मतदानावेळी सुरक्षेसाठी सज्ज राहतील.
 
निमलष्करी दलांचे बहुतांश जवान कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना तैनातीच्या ठिकाणी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्नाटकात मतदानासाठी 56 हजारहूून अधिक केंद्रांची व्यवस्था केली जाणार आहे. त्या राज्यातील मतदारांची संख्या सुमारे 4 कोटी 96 लाख इतकी आहे.