बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 15 एप्रिल 2018 (00:11 IST)

पावसाळ्यातील विजेचा धोका हे अॅप सांगेल सर्वात आधी

आपल्या देशात मान्सून मध्ये आणि अवकाळी पावसात वीज कोसळून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या देशभरात मोठी आहे. विशेतः शेतकरी आणि गुराखी यांना आपला जीव गमवावा लागतो.  वीज कोसळणे ही पूर्णत: नैसर्गिक घटना. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे अजूनतरी माणसाला आणि  विज्ञानाला शक्य झाले नाही. मात्र  वीज कोसळण्याची पूर्वमाहिती आता  मिळू शकणार आहे. कर्नाटकच्या नॅचरल डिजास्टर मॉनेटरींग सेंटर (KSNDMC) आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटने मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. 'सिदिलु' असे नाव असलेलेल हे अॅप युजर्सला वीज कोसळण्यापूर्वी किमान ४५ मिनिटे अलर्ट देणार आहे. अॅप गुगल प्ले स्टोअरव आणि अॅपल स्टोअरवर मोफत उपलब्ध असून, तुम्ही ते केव्हाही डाऊनलोड करू शकता. हे अॅप वीज कोसळण्यापूर्वी ४५ मिनिटे आगोदर तुम्हाला संकेत  देणार आहे. यामुळे अनेक   नागरिकांचे प्राण वाचणार आहे.