1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 एप्रिल 2023 (14:49 IST)

वैष्णोदेवी यात्रा सुलभ होईल : नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की इंटर मॉडेल स्टेशन (IMS) हा "जागतिक दर्जाचा" प्रकल्प असेल जो माता वैष्णो देवी मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंच्या प्रवास सुलभ करेल. अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी सुमारे 5,300 कोटी रुपये खर्चून 110 किलोमीटर लांबीचा अमरनाथ रस्ता तयार करण्यात येणार असल्याची घोषणाही नितीन गडकरी यांनी केली.
 
कटरा येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, कटरा येथे स्थापन करण्यात येणारा IMS हा जागतिक दर्जाचा अत्याधुनिक प्रकल्प असेल, ज्याची रचना श्री माता वैष्णो देवी मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंच्या प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी केली जाईल.
 
गडकरी म्हणाले, की जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही सव्वा लाख कोटी रुपये खर्चून रस्ते प्रकल्प उभारत आहोत. 25,000-30,000 कोटी रुपयांच्या रोपवे आणि केबल कारसाठी 20 ते 22 प्रस्ताव आहेत, ज्यावर आम्ही काम करत आहोत. यामध्ये पर्यटकांची संख्या चौपट वाढेल आणि केंद्रशासित प्रदेश स्वयंपूर्ण आणि समृद्ध होईल.