Marathi Biodata Maker
✕

चारा घोटळा, चौथ्‍या प्रकरणातही लालूप्रसाद यादव दोषी

Updated: सोमवार, 19 मार्च 2018 (15:40 IST)

चारा घोटाळ्यात एकूण सहा प्रकरणे आहेत, यातील चौथ्‍या प्रकरणावर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने  त्‍यांना दोषी ठरविले.  चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये लालूंना याआधीच दोषी ठरविण्यात आले आहे. झारखंडमधील डुमका येथील कोषागारातून बेकायदेशीररित्या ३ कोटी १३ लाख रुपये काढल्याचा त्यांच्यावर चौथा आरोप आहे. या आरोपांवरील सुनावणी ५ मार्च रोजीच पूर्ण झाली होती. मात्र, लालूंच्या वतीनं वेळोवेळी करण्यात आलेल्या याचिकांमुळे त्यावरील निर्णय रखडला होता.  अखेर या आरोपांवर सुनावणी झाली. त्‍यात लालू यांना दोषी ठवण्यात आले तर, याच प्रकरणात माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची निर्दोष सुटका झाली आहे. 

याप्रकरणी लालू प्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांच्यासह ३१ जणांना आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाने यातील १९ जणांना दोषी ठरवले असून, १२ जणांची सुटका केली आहे. लालूंच्या शिक्षेवर २१, २२ आणि २३ मार्चला सुनावणी होणार आहे.  दरम्‍यान, चारा घोटाळ्यात लालूंना साडेतेरा वर्षांची शिक्षा झाली असून, ते सध्या रांची येथील बिरसा मुंडा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments