धैर्य सोडू नका...लॉकडाउनची गरज पडणार नाही: मोदीचं जनतेला आवाहन

Narendra Modi
Last Modified मंगळवार, 20 एप्रिल 2021 (21:14 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत म्हटलं की कोरोनाविरुद्ध देश मोठी लढाई लढत आहे. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती तर काही आठवड्यांपूर्वी परिस्थिती आटोक्यात होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट वादळाप्रमाणे आली आहे.

ज्यांनी आपल्या जवळीक लोकांना गमावलं आहे, मी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. कुटुंबातील एक सदस्य म्हणून, मी तुमच्या दु:खात सहभागी आहे. कोरोनामुळे प्राण गमवणार्‍यांना श्रद्धांजली देत ते म्हणाले की हे संकट मोठं आहे. आपल्याला र्धेय बाळगावा लागेल, साहस दाखवावा लागेल. अनुशासनाने वागल्याने परिस्थिती बदलेल कारण लॉकडाउन हा अंतिम पर्याय समजावा. त्यांनी म्हटलं की जनता स्वयंशिस्तीने वागाल्यास लॉकडाऊनची परिस्थिती येणार नाही.

देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. देश आणि राज्य सरकार ही गरज भागवण्यावर लक्ष ठेवत आहेत. देशात ऑक्सिजनची निर्मिती वाढवण्यावर लक्ष दिलं जात आहे, असं मोदींनी सांगितलं. केंद्र सरकार, राज्य सरकार, खाजगी कंपन्या यांच्याद्वारे ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एक लाख नवे ऑक्सिजन सिलिंडर, औद्योगिक वापरासाठीचा ऑक्सिजन रुग्णांसाठी तसंच ऑक्सिजन एक्स्प्रेस हे उपाय केले जात आहेत. फार्मा कंपन्यांनी औषधाचं उत्पादन वाढवलं आहे.
जो त्रास तुम्हाला होत आहे त्याची मला पूर्ण जाणीव आहे."

मोठी लसीकरण मोहीम सुरु असून सध्या देशात दोन स्वदेशी लसीचं उत्पादन सुरु आहे. जगातील सगळ्यांत मोठी लसीकरण मोहीम आपण राबवत आहोत. 1 मे नंतर अठरा वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांना लस देण्यात येईल. लस तयार होईल त्यापैकी अर्धा हिस्सा राज्यं आणि खाजगी क्षेत्राला मिळेल.

श्रमिकांना लस मिळेल तर कामगरांनी पलायन करुन नये. राज्य प्रशासनाला आग्रह आहे की त्यांनी श्रमिकांचा विश्वास मिळवावा. तुम्ही आहात तिथेच राहा. राज्यांद्वारे असा विश्वास मिळाला तर श्रमिकांचा फायदा होईल.

काळ कठीण आहे तरी आपण धैर्य सोडू नका. आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रयत्न केला तरच विजय मिळवू शकतो. साहस, धैर्य आणि अनुशासन हा मंत्र समोर ठेवा.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह ...

परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट दाखवावा लागेल, सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली
कोरोना महामारीचा उद्रेक अजून संपलेला नाही. दरम्यान, भारत सरकारने परदेशातून येणाऱ्या ...

Actress Molested In Flight: दिल्लीहून मुंबईला जात असताना ...

Actress Molested In Flight: दिल्लीहून मुंबईला जात असताना अभिनेत्रीचा विनयभंग, गाझियाबादच्या व्यावसायिकाला अटक
दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानात बॉलिवूड अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी ...

“तुम्ही गावासाठी काय केले?” विचारल्यावर आमदाराचा राग अनावर, ...

“तुम्ही गावासाठी काय केले?” विचारल्यावर आमदाराचा राग अनावर, तरुणाला मारहाण
मंगळवारी समराळा गावात, हर्ष नावाच्या तरुणाने भोआ येथील काँग्रेसचे आमदार जोगिंदर पाल सिंह ...

जावेद अख्तर यांचे मोठे विधान, फिल्म इंडस्ट्री हायप्रोफाईल ...

जावेद अख्तर यांचे मोठे विधान, फिल्म इंडस्ट्री हायप्रोफाईल असण्याची किंमत मोजत आहे
चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या प्रकरणाबाबत जावेद अख्तरने मोठे विधान ...

'आर्यन खान बेकायदेशीरपणे कोठडीत,' शिवसेनाच्या किशोर ...

'आर्यन खान बेकायदेशीरपणे कोठडीत,' शिवसेनाच्या किशोर तिवारींची सुप्रीम कोर्टात धाव
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी शिवसेनेनं आर्यन खानच्या मुलभूत हक्कांच्या संरक्षणाची ...