मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (11:18 IST)

मोठा अपघात: भोपाळमध्ये दुर्गा विसर्जनासाठी जाणाऱ्या जमावावर कार ने धडक दिली ,एकाचा मृत्यू

Major accident: A car hit a crowd going for immersion of Durga in Bhopal
भोपाळ. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये दुर्गा विसर्जनासाठी जाणाऱ्या जमावावर एका माथेफिरूने कार ने धडक दिली . या वेदनादायक अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत.

भोपाळच्या बाजारिया पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी रात्री 11:15 च्या सुमारास खळबळ उडाली. पाठीमागून भरधाव कार मिरवणुकीत शिरली. चेंगराचेंगरी झाल्यानंतर कार वेगाने मागे घेत चालक पसार झाला  लोकांनी कार चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो घटनास्थळावरून पळून गेला.
 
यानंतर उपस्थित जमावाने गोंधळ सुरू केला. दुसरीकडे, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, यामुळे भाविकांनी पोलीस स्टेशन बाजारियासमोर चक्काजाम केला. 

हे लक्षात घेण्याजोगे आहे की यापूर्वी लखीमपूर आणि जशपूर येथे सुद्धा वेगाने चाललेल्या कारने लोकांना चिरडल्याच्या घटना घडल्या होत्या. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.