1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. mamta benerji

बंगाल : 1 ऑक्टोबरला दुर्गा मूर्तींच्या विसर्जनावर बंदी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 1 ऑक्टोबरला दुर्गा मूर्तींच्या विसर्जनावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

यंदा दुर्गा विसर्जन आणि मोहरम एकाच दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबरला आहे. मोहरममुळे दुर्गा पुजेनंतर होणाऱ्या विसर्जनावर 30 सप्टेंबर संध्याकाळी 6 पासून 1 ऑक्टोबरपर्यंत बंदी राहिल. विसर्जन 2,3, 4 ऑक्टोबरला करता येईल, असं ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं ममता सरकारचं म्हणणं आहे.

पुढील लेख
इराणी यांनी संस्कृतमध्ये घेतली शपथ