गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दुष्कर्माच्या खोट्या आरोपात फसवण्याची धमकी देत मागितले 20 लाख

शिमला- नाहन शहरातील योगेश कुमारने विष घेऊन आत्महत्या केली होती. आता यात नवीन वळण म्हणजे पोलिसांना मृतकाच्या पत्नीने एक सुसाइड नोट दिली ज्यात योगेशच्या मृत्यूचे कारण एक महिला असल्याचे समोर आले आहे.
 
ही महिला त्याला दुष्कर्माच्या खोट्या आरोपाखाली फसवण्याची धमकी देत 20 लाख रुपये मागत होती. परिणामस्वरूप पतीने विष पिऊन आत्महत्या केली. प्रकरण 11 मे रोजी घडले आहे.
 
उल्लेखनीय आहे की 32 वर्षीय योगेश राजगढहून एक महिना पूर्वीच ट्रांसफर होऊन शिलाईच्या जेएमआयसीमध्ये तैनात झाला होता. 11 मे रोजी अचानक त्याने आत्महत्या केली. नंतर पोलिसाने प्रकरणाची नोंद घेत पोस्टमार्टम झाल्यावर मृतदेह कुटुंबीयांना सोपवून दिले होते. आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिस मृतक योगेशच्या घरी गेली होती. परंतू त्यांना तिथे सुसाइड नोट सापडले नव्हते. 
 
पत्नी किरण बिछाना स्वच्छ करत असताना चादरीखाली तिला योगेशने लिहिलेलं सुसाइड नोट सापडलं. मृतकाची पत्नी नोट घेऊन पोलिस चौकीत पोहचली. यात राजगढच्या महिलेकडून खोट्या आरोपात फसवण्याच्या मोबदला म्हणून 20 लाख रूपयांची मागणी केल्याचे वर्णित होते. महिलेसह राजगढ येथील दोन व्यक्तींच्या नावाचा देखील उल्लेख केला गेला आहे.