1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (12:49 IST)

मंत्रींच्या बंगल्यात कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे

Mango
सामान्यतः आंब्याच्या झाडावर आंबा हे फळ लागते. पण मध्य प्रदेशमधील मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या घराच्या परिसरात कडुलिंबाच्या झाडाला चक्क आंबे लागले आहेत. हे दृश्य पाहून सर्वानांच आश्चर्य होत आहे. 
 
प्रल्हाद पटेल हे मध्य प्रदेश सरकारचे मंत्री आहे. ते पंचायत आणि ग्रामीण विकासाचे काम सांभाळतात. त्यांच्या बंगल्यामध्ये एक कडुलिंबाचे झाड आहे. पण त्या कडुलिंबाच्या झाडाला चक्क आंबे लागले आहे. शनिवारी जेव्हा या झाडावर मंत्रींची नजर पडली. तर ते देखील आश्चर्यचकित झाले. त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ अपलोड केला. त्यानंतर सर्वीकडे चर्चा सुरु आहे. 
 
त्यांनी सोशल मीडियावर एक्स वर व्हिडीओ शेयर करत म्हणाले की, भोपाळमधील निवास्थानावर कडुलिंबाच्या झाडाला आलेले आंब्याचे फळ पाहून आश्चर्य वाटले. अनुमान लावण्यात येत आहे की हे झाड कमीतकमी 30 वर्ष जुने आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना या झडाचे विशेष लक्ष्य ठेवण्यास सांगितले आहे. 
 
मंत्री प्रल्हाद पटेल यांचे निवास्थान भोपाळच्या प्रोफेसर कॉलोनीत सिविल लाईन मध्ये B-7 बंगल्यामध्ये आहे. त्यांच्या बंगल्याजवळ मोठ्या संख्येमध्ये झाडे आहे. यामध्ये एक कडुलिंबाचे झाड देखील आहे. सध्या त्यांच्या बंगल्याचे काम सुरु आहे. तसेच निरीक्षण करीत असताना हे झाड त्यांच्या दृष्टीस पडले. 

Edited By- Dhanashri Naik