गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (20:45 IST)

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही : मुख्यमंत्री

Marathi has not yet got the status of an elite language due to the Central Government: Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडून यासंदर्भात सर्व पूर्तता झाली असून केंद्रानेच हा दर्जा दिलेला नाही असा आरोप केला आहे. विधासनभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भात आभार व्यक्त करताना उद्धव यांनी केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाल नसल्याचे सांगितले. मराठी काय भिकारी आहे का?, महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभे आहोत का?, असे प्रश्न उद्धव यांनी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान उपस्थित केले.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यापालांचे आभार मानल्यानंतर भाषणामध्ये सर्वात आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील निर्णय केंद्राने अडकवून ठेवल्याचा आरोप केला.  “मुख्यमंत्री म्हणून माझ्या कार्यकाळातील दुसरा मराठी भाषा दिन झाला. त्या मराठी भाषादिनानिमित्त आम्ही म्हणत असतो की मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देऊ. आम्ही म्हणजे कोण देणार आहे?, आपल्याकडून ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व देण्यात आल्या आहेत. आणखीन काही लागल्या तर त्याही देऊ. मात्र अजूनही केंद्राकडून माझ्या या मातृभूमिला तिष्ठत उभं ठेवलं आहे,” असं उद्धव यांनी म्हटलं आहे.