साडीचा होणार विश्व विक्रम, गिनीज बुकात नोंदीची शक्यता
हो. भारतीय महिलांची ओळख आहे साडी. ही बाब लक्षात घेत एका महिलेने साडी घालून एक मोठो रेस पूर्ण केली आहे.त्यामुळे आता साडी घालून ही पूर्ण केली म्हणून तिची नोंद गिनीज बुकात होणार आहे.
मॅरेथॉनमध्ये धावायचं म्हटलं की महिला आणि पुरुष लहान कपडे घालतात. विशेषतः अनेक महिला तोडके कपडे घालतात. मात्र धावायचं म्हणजे शॉर्ट, टी-शर्ट, शूज सगळं कसं व्यवस्थित असावं लागतं. पण एखाद्या तरुणी किंवा महिलेला साडी नेसून मॅरेथॉनमध्ये धावायला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. मात्र असे हैद्राबाद येथे झाले आहे. जयंती संपत कुमारही नेसून मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली नाही, तर 42 किमी अंतर पुर्णही केलं आहे. संपुर्ण मॅरेथॉन पार पडेपर्यंत सर्वाचं लक्ष फक्त तिच्याकडेच लागलं होतं. ती साडी घालून मात्र योग्य पद्धतीने आणि वेळेत धावली आहे.तिने असे साडी का निवडली यावर ती म्हणली की हातमाग वस्त्रांचं प्रमोशन करण्यासाठी , महिलांना प्रोत्साहित करण्याच्या तिने साडी घातली आहे. साडी हे वस्त्र घालून इतकी मोठी रेस पूर्ण केली म्हणून जयंतीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठीही अर्ज केला आहे. या रेस साठी सुमारे देश आणि विदेशातून २० हजार स्पर्धक सामील झाले होते.