गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 22 ऑगस्ट 2017 (12:08 IST)

गर्लफ्रेंडकडूनच नायजेरियन नागरिकाची हत्या

दिल्लीत राहणाऱ्या एका 30 वर्षीय नायजेरियन नागरिकाची त्याच्या गर्लफ्रेंडकडूनच भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्याची ही गर्लफ्रेंडही त्याच्याच देशातील आहे. ते दोघेही दक्षिण पश्‍चिम दिल्लीतील उत्तमनगर भागात राहायला होते.
 
ईझ्झु असे यात मरण पावलेल्या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे. तो गार्मेंट विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्या गर्लफ्रेंडशी त्याचा वाद झाल्यानंतर रागाच्या भरात तिने त्याला भोसकले त्यात तो ठार झाला. तो जखमी झाल्यानंतर तिनेच त्याला रुग्णालयात दाखल केले पण तो मरणपावल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या प्रकारानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीला अटक केली आहे.