बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

धर्मांतर कर अर्थात हिंदू हो तरच लग्न करेल, मुलीची मागणी

धर्मांतर कर अर्थात हिंदू हो तरच लग्न करेल, मुलीची मागणी हिंदू मुलीने तिचा मुस्लीम प्रियकर असलेल्या मुस्लीम धर्मीय मुलाला धर्मांतर कर तरच लग्न करेल अशी अट घातली आहे त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. राजस्थान जोधपुर येथे सध्या हे प्रकरण गाजत आहे. आधी लव जिहाद म्हणून समोर आले मात्र मुलीची मागणी पाहून हिंदू संघटना सुद्धा बुचकाळ्यात पडल्या आहे. या प्रकरणात पूजा जोशी  वय वीस वर्ष तरुणीचं नाव आहे. तर तिचा मुस्लिम प्रियकर मोहसीन खान आहे. ती त्याच्या सोबत काही दिवसांपूर्वी पळून गेली. मोहसीन खान टॅक्सी चालवतो. पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे हे सर्व प्रकरण उघड झाले आहे. पोलिसांनी बिकानेरमधून एका दांपत्याला ताब्यात घेतलं आहे.मात्र ही बातमी पूर्ण  शहरात पसरली की एक हिंदू तरुणी एका मुस्लिम तरुणासोबत पळून गेली आहे. या दोघांना जोधपुर येथे पोलीस ठाण्यात आणलं होते.  त्यावेळी हिंदू संघटनांचे कार्यकर्ते तसंच नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती. लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप करत मोहसिन खानला मारहाण केली. मात्र जेव्हा तरुणी पूजा जोशीचा जबाब नोंदवण्यासाठी तिला दंडाधिका-यांसमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी आपल्या जबाबात जर मोहसिनने हिंदू धर्म स्विकारला तर त्याचीशी लग्न करणार असल्याचं पूजा जोशीने नमूद केले आहे. माहिती एसीपी पूजा यादव यांनी दिली आहे. या अजब प्रकार समोर आला तेव्हा हिंदू संघटना बुचकाळ्यात पडल्या आणि आता काय करावे त्यांना समजले नाही.