बुधवार, 2 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 एप्रिल 2025 (14:28 IST)

बनासकांठा येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग, 17 कामगारांचा होरपळून मृत्यू

Firecracker Factory Boiler Explosion
गुजरात गुजरातमधील बनासकांठा येथील डीसा येथील धुनवा रोडवरील फटाक्याच्या कारखान्यात आणि गोदामात भीषण आग लागली. ज्यामुळे कारखान्यात काम करणाऱ्या 17 कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
तर उर्वरित जखमी कामगारांना रुग्णालयात नेण्यात आले. जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉयलरच्या स्फोटामुळे आगीची घटना घडली. आग लागल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यास सुरुवात केली. आगीमुळे कारखान्याचा पहिला मजला कोसळला. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतांना आणि आणि जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. आगीमुळे कारखान्याचा स्लॅब तुटला त्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला. आगी नंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.  या कारखान्यात स्फोटके बाहेरून आणून फटाके तयार करायचे.
कारखान्याच्या मालकाकडे कारखाना चालवण्याचा परवाना होता की नाही याचा तपास केला जात आहे. 
प्रशासन अपघाताची चौकशी सुरू ठेवत आहे. अपघाताचे खरे कारण लवकरच कळेल.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की स्फोट इतका शक्तिशाली होता की कारखान्याचे अनेक भाग कोसळले. आजूबाजूची दुकानेही हादरली. स्फोटामुळे अनेक दुकानांचे सामानही विखुरले.
Edited By - Priya Dixit