गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (16:42 IST)

जबलपूर रुग्णालयात भीषण आग, 10 जणांचा मृत्यू; अनेक लोक जळाले

जबलपूर शहरातील न्यू लाईफ स्पेशालिटी हॉस्पिटलला लागलेल्या आगीत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.या आगीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.या आगीत अर्धा डझनहून अधिक लोक जळाले आहेत.अपुष्ट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत अनेक रुग्ण जिवंत जळाले आहेत.अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.आगीमुळे रुग्णालयात बराच वेळ घबराटीचे वातावरण होते.
  
 काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने असेही बोलले जात आहे की, रुग्णालयातून सुमारे 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत.आता आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.रुग्णालयात किती रुग्ण दाखल झाले याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.या हॉस्पिटलमध्ये सुमारे 100 लोकांचा स्टाफ आहे.मात्र, एकूण मृतांचा आकडा किती असावा याबाबत साशंकता आहे.आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, दमोह नाका येथून काही लोक निघत असताना हॉस्पिटलमध्ये आग लागल्याचे दिसले तेव्हा ही घटना उघडकीस आली.त्यावेळी लोकांनी आरडाओरडाही ऐकला.यानंतर या लोकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.मात्र आग इतकी भीषण होती की अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग सर्वत्र पसरली होती.