रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 जुलै 2018 (16:23 IST)

वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात मौलवीकडून महिला वकिलाला मारहाण

एका वृत्तवाहिनीवर तिहेरी तलाकवरून सुरु असलेल्या चर्चासत्रात एका मौलवीने महिला वकिलाच्या कानशिलात लगावत तिला मारहाण केली आहे. झी हिंदुस्थान या वाहिनीच्या या कार्यक्रमात मौलवी इजाज अर्शद कासमी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वकील फराह फैज यांना कानशिलात लगावली. याप्रकरणी पोलिसांनी कासमी यांना अटक केली आहे.
 
या चर्चासत्रात काही मुद्द्यावरून कासमी व फैज यांच्यात वाद झाला व त्यानंतर कासमी यांनी फैज यांना मारहाण केली. त्यानंतर इतर उपस्थितांनी त्या दोघांना अडविल्यामुळे ही हाणामारी थांबली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.