शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गुप्तांग चावले, बलात्कारानंतर हत्या

minor killing after rape in shahjahanpur
शाहजहांपूर- जिल्ह्यात एक अल्पवयीन दलित तरुणीचे शव नग्नावस्थेत उसाच्या शेतात सापडले आहेत. शवावर दाताने चावल्याचे निशाण आहे जे बघून बलात्कारानंतर हत्या झालेल्याची पोलिसांनी आशंका व्यक्त केली आहे.
 
पोलिस अधीक्षक नगर दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले की अहमदनगर गाव रहिवासी 14 वर्षीय तरुणी मंगळवारी दुपारी शेतात कामावर गेली होती. संध्याकाळपर्यंत घरी परतली नाही म्हणून शोध सुरू झाला. या दरम्यान उसाच्या शेतात तिचं शव नग्नावस्थेत पडलेले सापडले. मान कापून तिची हत्या केली असून तिच्या शरीरावर दाताने चावल्याचे निशाण दिसत होते.
 
थाना प्रभारी इस्तखार अहमद यांनी सांगितले की तरुणीच्या शवाजवळ दारूचे पाच रिकामे पाउचही सापडले आहे. तरुणीच्या गुप्तांगांवर दाताने चावल्याने निशाण असून तिच्यावर चाकूने वार केले गेले होते. मृतका आठवीची विद्यार्थी होती. बलात्कारानंतर हत्या केली असावी अशी पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे.
 
पोलिसांनी अज्ञात खूनीविरूद्ध प्रकरण नोंदवून शव पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिस आरोपींच्या शोधात आहे.