मोदीजींचा 22 फेब्रुवारी ला आसाम आणि बंगाल चा दौरा, बऱ्याच प्रकल्पांचे उद्घाटन करतील

narendra modi
Last Modified शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (20:21 IST)
नवी दिल्ली : पंत प्रधान नरेंद्र मोदी 22 फेब्रुवारी रोजी निवडणूक राज्य आसाम आणि पश्चिम बंगालचा दौरा करणार आहे, ते तेल व गॅस क्षेत्रासह रेलवेच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास
करतील.पंतप्रधान कार्यालयाने(पीएमओ)जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहेत की सोमवारी मोदीजी आसामच्या धेमाजी येथे आयोजित एका समारंभात तेल आणि गॅस क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योजनेला देशाला समर्पित करतील आणि त्या नंतर पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये अनेक रेलवे प्रकल्पांचे उद्घाटन करतील.

आसाम मध्ये पंतप्रधान ज्या तेल आणि गॅस प्रकल्पांना देशाला समर्पित करतील, त्यामध्ये बोंगाईगांवात इंडियन ऑइलचे ईंडमॅक्स (आयएनडीएमएएक्स) दिब्रुगड मधील मधुबन येथे ऑइल इंडिया लिमिटेडचे सहाय्यक टॅन्कफॉर्म आणि तिनसुकियामधील हेबेडा गावाचे गॅस कम्प्रेशर स्टेशनचा समावेश आहे.
या वेळी पंतप्रधान धेमाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन करतील आणि सुआलकुची अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शिलान्यास देखील करतील.
पीएमओ च्या म्हणण्यानुसार हे प्रकल्प ऊर्जा सुरक्षा आणि समृद्धीच्या क्षेत्रात एका युगाची सुरुवात आहे आणि या मुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या वेळी आसामचे राज्यपाल जगदीशमुखी, मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि
केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान देखील उपस्थित राहणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नोआपाडा ते दक्षिणेश्वर दरम्यान मेट्रोच्या विस्तारित सेवेचे उद्घाटन करतील आणि या विभागात पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.सुमारे ४.१ किमी लांबीच्या या विस्तारित खंडाच्या बांधकामासाठी सुमारे 464 कोटी रुपये खर्च आला आहे.हा संपूर्ण खर्च केंद्र सरकारने उचललेला आहे. या व्यतिरिक्त पंत प्रधान दक्षिण- पूर्व रेलवेच्या १३२कि.मी. लांब खडगपूर -आदित्यपुर तिसऱ्या मार्गाच्या प्रकल्पांतर्गत कलाईकुंडा आणि झाडग्रामाच्या दरम्यान ३० किमी लांबीच्या खण्डाचे उद्घाटन करतील .कलाईकुंडा आणि झाडग्राम च्या दरम्यान ४ स्थानकांना पुनर्विकसित केले आहे.

या दरम्यान पंतप्रधान पूर्व -रेलवेच्या हावडा- बंडल -अजिमगंज विभागांतर्गत अजिमगंज आणि खारगराघाट रस्त्या दरम्यान दुप्पटीकरण राष्ट्राला समर्पित करतील, तसेच ते डानकुनी आणि
बारुईपाड़ा च्या दरम्यान चवथा मार्ग आणि रसूलपूर आणि मार्गाच्या दरम्यान तिसऱ्या रेलवे लाईन सेवेचे उद्घाटन करतील.
पीएमओच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पांमुळे लोकांना वेळेच्या बचतीसह चांगली वाहतूक सेवा मिळेल आणि क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. आसाम आणि पश्चिम बंगाल सह ५
राज्यात या वर्षी एप्रिल-मे मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे.आसाममध्ये ,जेथे भाजपा सत्तेत परत येण्याच्या प्रयत्नात आहे, तेथे पश्चिम बंगाल मधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला सत्तेतून काढून टाकण्याचे
लक्ष्य आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकचा कोवाक्सिन ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकचा कोवाक्सिन घेतला, ट्विट केले फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ...

अहमदाबादच्या आयशाने हसणारा व्हिडिओ बनवून साबरमती नदीत उडी ...

अहमदाबादच्या आयशाने हसणारा व्हिडिओ बनवून साबरमती नदीत उडी मारली, त्याचे कारण दीड लाख रुपये हुंडा!
तुम्ही बर्‍याच सुसाईड नोट्स पाहिल्या असतील, त्या वाचल्या असतील पण अलीकडे सोशल मीडियावर ...

5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर

5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर
निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पश्चिम ...

दिल्ल्लीला जाणार आहात, आधी बातमी वाचा मगच नियोजन करा

दिल्ल्लीला जाणार आहात, आधी बातमी वाचा मगच नियोजन करा
देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढतेय. यापार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय ...

मोटेरा स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम, ...

मोटेरा स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम, राष्ट्रपतींनी केले उद्घाटन
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी जगातील सर्वात मोठे सरदार क्रिकेट स्टेडियम आणि ...