शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (19:29 IST)

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. आज म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२१ रोजी संपूर्ण देशातून मान्सून परतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. पहिल्यांदाच गेल्या काही वर्षांत मान्सून इतके दिवस भारतात सक्रिय राहिला आहे.
 
यावर्षी मान्सून सामान्य राहणार असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. मराठवाडा, विदर्भ, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.