शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (11:47 IST)

मुलाच्या लग्नात डीजेवर नाचताना आईचा मृत्यू

मुलाच्या लग्नात डीजेवर नाचताना आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरामुलगाही आईसोबत नाचत होता. खाली पडलेल्या आईला मुलाने सांभाळले, पण आईचा त्यांच्या मांडीतच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना 3 फेब्रुवारीची आहे, आता त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
 
अलवरच्या चिकणीमध्ये सतीश आणि नीलम यांचा मुलगा नीरज यांचा विवाह होता. ही मिरवणूक किशनगढबसातील बांबोरा येथे जाणार होती, जिथे 4 फेब्रुवारी रोजी लग्न होणार होते. 55 वर्षीय आई नीलम 3 फेब्रुवारी रोजी रात्री डीजेवर डान्स सुरू असताना नाचत होत्या. नाचत असताना त्या अचानक कोसळ्या आणि जमिनीवर पडल्या. मुलाने तात्काळ आईची काळजी घेत तिला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी नीलमला मृत घोषित केले.
 
अवघ्या 20 सेकंदात मृत्यू झाला
कुटुंबीयांनी सांगितले की, नीलमने काही सेकंदच डान्स केला. मुलगा नीरजही आईजवळ नाचत होता. यादरम्यान आई नाचत असताना पडली आणि तिचे हृदय निकामी झाले, सुमारे 20 सेकंदात त्यांनी आपला जीव गमावला.
 
आईचा अंत्यविधी, दुसऱ्या दिवशी लग्न
या अपघाताने कुटुंबावर डोंगरासारखे संकट ओढवले. प्रथम आईचे अंतिम संस्कार केले गेले. मग दुसऱ्या दिवशी चार सदस्य लग्नासाठी पोहचले आणि केवळ फेरे घेतले. अशी घटना यापूर्वी जिल्ह्यात कधीच पाहिली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
 
महिलेला आधीच हृदयविकाराचा त्रास होता
गावातील लोकांनी सांगितले की, महिलेला आधीच हृदयविकाराचा त्रास होता. त्यासाठी औषधेही सुरू होती. याच कारणामुळे त्या दिवशी डान्स करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे समजते.