मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 9 जून 2024 (19:34 IST)

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ

Narendra Modi took oath as Prime Minister for the third time
नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 
एनडीए आघाडीनं लोकसभा निवडणुकीत 293 जागा मिळवत सत्ता स्थापन केली आहे. तर भाजपला स्वबळावर 240 जागा मिळवण्यात यश आलं आहे.
 
शपथविधी सोहळ्यात मान्यवरांसह सेलिब्रिटींची उपस्थिती
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश विदेशातील सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली.
 
यावेळी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह शाहरूख खान, रजनिकांत, मुकेश अंबानी, गौतम अदानी, अक्षय कुमार यांचाही उपस्थितांमध्ये समावेश आहे.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या भावी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देत आहेत. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक देशांचे सरकार प्रमुखही भारतात आले आहेत.