राष्ट्रवादीची भाजपसोबत युती… नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा नविन प्रयोग
नागालँड विधानसभेत NDPP आणि भाजपा युतीला स्पष्ट बहूमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचालीत ऱाष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने सत्तेत वाटा मिळवला आहे. NDPP आणि भाजप यांच्या विरोधात न जाता त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयाने राजकिय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
NDPP आणि भाजपा युतीला नागालँड विधानसभेच्या निवढणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. NDPP- भाजपा राज्यातील अनेक छोट्यामोठ्या पक्षांनी पाठींबा दिला आहे. त्यामुळे हे सरकार मजबूत स्थितीमध्ये होता. तरीही प्रमुख विऱोधी पक्ष म्हणून उदयास आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसने NDPP- भाजपा युतीला पाठींबा देऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या या भुमिकेमुळे नागालँड विधानसभेत आता विरोधी पक्षाचे अस्तित्व राहीले नाही. या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने २ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळवला.
नागालँडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा केली. या बैठकीनंतर नागालँडमध्ये NDPP- भाजपा युतीच्या सरकारला पाठिंबा देण्याचे शिक्कामोर्तंब झाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor