1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (15:55 IST)

रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम,जाणून घ्या कोणते आहे नियम

New rules for ration card holders
रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी आहे. रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.सध्या दिल्ली सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नियमांमध्ये बदल झाल्यानंतर आपण दुकानात न जाता घरच्या घरीच रेशन घेऊ शकता.
 
दिल्ली सरकारने जाहीर केले आहे की जे मोफत रेशनची सुविधा घेतात आणि दुकानात जाऊन रेशन मिळवू शकत नाहीत, त्यांना आता घरी बसून रेशन मिळेल.जर आपण रेशन घेण्यासाठी जाऊ शकत नाही तर आपण दुसऱ्याला पाठवून देखील रेशन मिळवू शकता. जे वैद्यकीय दृष्टीने कमकुवत आहे किंवा अपंग आहे.किंवा वयामुळे जाऊ शकत नाही तर ते  इतर कोणत्याही व्यक्तीला या कामासाठी पाठवू शकता.
 
या पूर्वी रेशन घेण्यासाठी रेशन घेणाऱ्या कार्डधारकाला बायोमेट्रिक फिंगरप्रिंट द्यावे लागतात.जेणे करून इतर कोणी आपले रेशन घेऊ शकणार नाही.परंतु सरकारने जारी केलेल्या नवीन नियमानुसार, कार्डच्या कोणत्याही सदस्याला पाठवून रेशन मिळवू शकता. 
 
या नियमाचा लाभ कोणाला मिळेल ? 
या नियमाचा  लाभ त्या लोकांना दिला जाईल ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे  किंवा 16 वर्ष खालील लोक ज्यांचे फिंगरप्रिंट्स  उमटत नाही. किंवा जे अपंग आहे.
 
आपल्या जागी इतर कोणाला रेशन कसे मिळणार?
 
* यासाठी शिधापत्रिका धारकाला नावनोंदणी फॉर्म भरावा लागेल.
* हा फॉर्म रेशन कार्ड,आधार कार्ड सोबत सबमिट करावा लागेल.
* या फॉर्मसह नॉमिनी असल्याची कागदपत्रेही सादर करावी लागतील.
* यानंतर, ज्या व्यक्तीला नॉमिनी केले गेले आहे ते आपल्या रेशन च्या दुकानात  जाऊन  रेशन घेऊ शकतात.