केरळमध्ये 2.46 कोटी रुपयांच्या बाद नोटा जप्त
केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यातील पेरिन्थलमन्ना येथे दोन मोटरगाड्यांमधून 2.46 कोटी रुपये रु. 1,000च्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी एर्नाकुलमहून पेरिन्थलमन्नला जाणाऱ्या दोन मोटरगाड्या सकाळी 11 च्या सुमारास ईएमएस हॉस्पिटलजवळ अडवल्या. तपासणी केली असता या गाड्यांमधील दोन बॅगांमध्ये रद्द करण्यात आलेल्या रु. 1,000च्या नोटांमधील ही रक्कम लपवून ठेवलेली सापडली. या प्रकरणी अटक करण्यात आलेले सहाजण 26 ते 39 वर्षे वयोगटातील आहेत. त्यांना या रकमेचा खुलासा करता आला नाही. ही रक्कम घेऊन जाण्यासाठी वापरलेल्या मोटरगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.