शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जून 2018 (15:52 IST)

आता मोबाइल फोन द्वारे करू शकता पासपोर्टसाठी आवेदन

सरकारने पासपोर्ट सेवेला सोपे करण्यासाठी एक अजून महत्त्वपूर्ण पाऊल उचलून देशातील कोणत्याही भागातून आवेदन करण्यासोबतच मोबाइल फोनद्वारे देखील आवेदन करण्याची सुविधा मंगळवारापासून सुरू केली आहे.
 
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पासपोर्ट सेवा दिवसाच्या निमित्ताने पासपोर्ट सेवा एप लाँच करून या दोन्ही सेवेला सुरू करण्याची घोषणा केली आहे.
सुषमा स्वराज यांनी म्हटले की आता देशाच्या कोणत्याही कोपर्‍यातून पासपोर्टसाठी आवेदन केले जाऊ शकते. पोलिस सत्यापन आवेदकाचे त्या पत्त्यावर होईल जो आवेदन फार्ममध्ये भरण्यात येईल. पासपोर्ट देखील त्याच पत्त्यावर पाठवण्यात येईल.
 
त्या पुढे म्हणाल्या की या प्रकारे एपाच्या माध्यमाने मोबाइल फोनद्वारे देखील पासपोर्टसाठी आवेदन केले जाऊ शकेल. या प्रसंगी संचार मंत्री मनोज सिन्हा आणि विदेश राज्य मंत्री जनरल वीके सिंह देखील उपस्थित होते.